बाळासाहेब थोरातांच्या घरासमोर बहीण आंदोलनाला बसली; मराठा आरक्षणासाठी आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 11:11 AM2020-10-02T11:11:31+5:302020-10-02T11:25:07+5:30
Maratha kranti morcha: मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (२६ सप्टेंबर) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
संगमनेर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (२६ सप्टेंबर) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ आॅक्टोबर ला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महसुलमंत्री, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर ठिया आंदोलन करण्यात येते आहे. या आंदोलनात महसूल मंत्री थोरात यांच्या भगिनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील सहभागी झाले आहेत.