तहसील कचेरीत सोयाबीन ओतून आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:34+5:302021-09-27T04:22:34+5:30

सोयाबीनचा दर ११ हजार रुपयांवरून कोसळून केवळ २० दिवसांमध्ये ४ हजार रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित ...

The agitation will start by pouring soybeans in the tehsil office | तहसील कचेरीत सोयाबीन ओतून आंदोलन छेडणार

तहसील कचेरीत सोयाबीन ओतून आंदोलन छेडणार

सोयाबीनचा दर ११ हजार रुपयांवरून कोसळून केवळ २० दिवसांमध्ये ४ हजार रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहेत. केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. २७ सप्टेंबर रोजी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

शेतकऱ्यांनी कोसळलेल्या दराला घाबरून जाऊन पॅनिक सेलिंग करू नये. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल अशी चिन्हे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जिवा गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

Web Title: The agitation will start by pouring soybeans in the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.