कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व महाबीज यांनी एकत्र येऊन काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:08+5:302021-09-11T04:22:08+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विभागीय कृषी ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शरद गडाख, प्रमोद रसाळ, दिलीप झेंडे, प्रमोद लहाळे, विठ्ठल शिर्के उपस्थित होते.
कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणाले, शेतातील सर्व प्रकारची कामे एकाच यंत्राने करता येतील अशा प्रकारचे यंत्र तयार करण्यासाठी विद्यापीठाने संशोधन करावे. जेणेकरून लहान शेतकऱ्यांना त्याचा सर्वांत मोठा फायदा होइल. नॅनो युरिया वापरासंबंधीच्या शिफारशी तसेच हरभरा या पिकाला खते देण्यासंबंधीच्या शिफारशी विद्यापीठाकडून मिळाल्या, तर त्या शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर होतील. यावेळी झालेल्या तांत्रिक सत्रात नंदकुमार कुटे, सुरेश दोडके, मधुकर भालेकर, मिलिंद देशमुख आणि वीरेंद्र बारई यांनी मार्गदर्शन केले.