अहमदनगर विधानभा निवडणूक निकाल : संग्राम जगताप विजयाच्या उंबरठ्यावर; १८ फे-या पूर्ण, ९ हजारांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 02:18 PM2019-10-24T14:18:29+5:302019-10-24T14:19:14+5:30
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप १८ व्या फेरीनंतर ९ हजार ४३३ मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे.
अहमदनगर : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप १८ व्या फेरीनंतर ९ हजार ४३३ मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे.
एकूण मतमोजणीमध्ये जगताप यांना एकूण १० हजारांचे मताधिक्य होते. मात्र ११ ते १४ या फेºयांमध्ये अनिल राठोड यांना जगताप यांच्यापेक्षा जास्त मते मिळाल्याने जगताप यांचे पाच हजारांचे मताधिक्य कमी झाले. अद्याप सहा फेºया बाकी आहेत. त्यामध्ये सारसनगर, कोठी, केडगाव असा जगताप यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जगताप यांनाच मताधिक्य मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
नागापूर, बोल्हेगाव, बालिकाश्रम रोड, गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रोफेसर कॉलनी चौक या भागातून आमदार जगताप यांना आघाडी मिळाली आहे. सिव्हिल हडको, मुकुंदनगर, भिंगार आणि माळीवाडा या भागातील मतपेट्यांमध्ये जगताप यांनाच आघाडी मिळाली. प्रभाग क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक २ मध्ये जगताप यांना आघाडी मिळाली आहे. विशेषत: गुलमोहोर रोड आणि प्रोफेसर चौक या भाजपच्या बालेकिल्ल्यात जगताप यांनी आघाडी घेतली आहे. बालिकाश्रम रोडवरही शिवसेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या भागातही जगताप यांनीच आघाडी घेतली आहे. मतमोजणी ही नागापूर-बोल्हेगाव या भागातून सुरू झाली आहे. त्यामुळे सावेडी उपनगराने जगताप यांच्या पारड्यात मते टाकली आहेत. दोन्ही फेरीत जगताप पुढे असून त्यांनी दुसºया फेरीत पहिल्या फेरीपेक्षा दुप्पट मतांनी आघाडी घेतली आहे.