अहमदनगर महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला : १ आॅक्टोबरला अंतिम प्रभाग रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:48 AM2018-07-28T10:48:32+5:302018-07-28T10:48:38+5:30

महापालिका निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचना, आरक्षण, सोडत व सुनावणी आदी कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे.

Ahmadnagar municipal elections startled: The final ward structure on October 1 | अहमदनगर महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला : १ आॅक्टोबरला अंतिम प्रभाग रचना

अहमदनगर महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला : १ आॅक्टोबरला अंतिम प्रभाग रचना

अहमदनगर : महापालिका निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचना, आरक्षण, सोडत व सुनावणी आदी कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे. 
नगर महापालिकेची मुदत २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. शुक्रवारी संभावित प्रभाग रचना, आरक्षण, सोडत व त्यावर अंतिम सुनावणी आदी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सन २०१७ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. ९ अन्वये महानगरपालिकांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली. त्यानुसार महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन एका प्रभागात जास्तीत जास्त ४ सदस्य करायचे आहेत. सर्व प्रभाग ४ सदस्यांचे होत नसल्यास  एक प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा होईल अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील. तसेच आरक्षण निश्चितीसाठी शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१६ ( प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे व त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) पारीत केले आहेत. त्यानुसार आरक्षित प्रभाग निश्चित करण्याकरिता कार्यवाही होणार आहे. 
या कार्यक्रमानुसार प्रारूप प्रभाग रचना करणे, आरक्षणाची सोडत काढणे, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवणे, सुनावणी देणे व अखेर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे ही कार्यवाही होणार आहे.
 महापालिका आयुक्तांना ही प्रक्रिया पूर्ण करायची असून, प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे.
दरम्यान, या प्रक्रियेमुळे इच्छुक अलर्ट झाले आहेत. आपल्या प्रभागाची काही तोडफोड होते का, प्रभागात आणखी भाग समाविष्ट होतो की दुसºया प्रभागात जातो, आरक्षण राहते की बदलते अशा अनेक हालचालींकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष राहणार आहे. 


प्रभाग रचना, आरक्षण कार्यक्रम असा
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करणे - ७ आॅगस्टपर्यंत 
हा प्रस्ताव तपासणी करून आयोगाकडे पाठवणे - १३ आॅगस्टपर्यंत
प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे - १८ आॅगस्टपर्यंत
नागरिकांचा मागासवर्ग व महिला आरक्षण सोडत  - २४ आॅगस्ट
प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्धी - २७ आॅगस्ट
प्रभाग रचनेवर हरकती, सूचना     - २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर
हरकती व सूचनांवर सुनावणी    - १५ सप्टेंबरपर्यंत 
सुणावणीवर अंतिम निर्णय    - २८ सप्टेंबरपर्यंत
प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्धी - १ आॅक्टोबर

Web Title: Ahmadnagar municipal elections startled: The final ward structure on October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.