अहमदनगर : आढळा धरणाच्या भिंतीतून पाणीगळती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 08:29 PM2018-01-13T20:29:52+5:302018-01-13T20:32:37+5:30

अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या भिंती मधून पाण्याची गळती वाढली आहे.

Ahmadnagar: Waterfall through the wall of adhal dam | अहमदनगर : आढळा धरणाच्या भिंतीतून पाणीगळती

अहमदनगर : आढळा धरणाच्या भिंतीतून पाणीगळती

अहमदनगर : अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या भिंती मधून पाण्याची गळती वाढली आहे. धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजा शेजारी दगडी बांधकामातून अनेक ठिकाणी पाण्याची चिंताजनक गळती सुरू आहे. अनेक वर्षांपासूनच्या पाझराचे रुपांतर आता लहानशा धबधब्यामध्ये झाल्याचे दिसून येते.

ठिकठिकाणच्या अनेक छिद्रांमधून एकत्रितपणे सुमारे एक क्युसेक वेगाने पाण्याची गळती होत असावी. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे  धरण भरल्यापासून सातत्याने पाण्याची गळती व भिंतीच्या बांधकामाची झीज होत आहे. मात्र, या ठिकाणी जलसंपदा विभागाने अद्यापही देखभालीसाठी प्रयत्न केले नाहीत. 

Web Title: Ahmadnagar: Waterfall through the wall of adhal dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण