अहमदनगर : आदर्श गाव, ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्द
By चंद्रकांत शेळके | Published: July 1, 2023 05:04 PM2023-07-01T17:04:47+5:302023-07-01T17:05:05+5:30
पुढील तारिख यथावकाश कळवली जाणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाने म्हटले आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागांतर्गत गत चार वर्षांपासून रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, तसेच आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण रविवारी (२ जुलै) पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार होते. परंतु हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाला असून पुढील तारिख यथावकाश कळवली जाणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाने म्हटले आहे.
कोरोनामुळे गत चार वर्षांपासून जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण केले नव्हते. केवळ घोषणा झालेली होती. आता एकत्रित २०१८-१९ ते २०२१-२२ या चार वर्षांतील एकूण ५५ ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. याशिवाय आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराने ३३ गावांचा सन्मान करण्यात येणार होता.
रविवारी (२ जुलै) सकाळी ११ वाजता नगरमध्ये पुरस्काराचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार होते. परंतु ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द झाला आहे. कार्यक्रमाची पुढील तारीख यथावकाश कळवली जाईल, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाकडून मिळाली.