अहमदनगर महाविद्यालयास आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार
By Admin | Published: July 13, 2017 01:50 PM2017-07-13T13:50:54+5:302017-07-13T13:50:54+5:30
नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या ग्लोबल सायन्स कॉंग्रेसच्या कार्यक्रमात आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार अहमदनगर महाविद्यालयास
लोकमत आॅनलाइन
अहमदनगर : ग्लोबल सोसायटी फॉर बेसिक अँड अप्लाईड सायन्सेस ठाणेच्या नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या ग्लोबल सायन्स कॉंग्रेसच्या कार्यक्रमात आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार अहमदनगर महाविद्यालयास देण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी ग्लोबल सोसायटीच्या अध्यक्ष डॉ.अनिता गोस्वामी गिरी, सचिव डॉ.रविंद्र क्षिरसागर उपस्थित होते.