अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा : काँग्रेसला झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:51 PM2019-04-25T13:51:26+5:302019-04-25T14:04:55+5:30
अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
श्रीरामपूर : अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र पक्ष सोडणार नसल्याची भुमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. ससाणे यांच्या भुमिकेमुळे काँग्रेसला यांना चांगलाच झटका बसला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने राजीनामा दिला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान साईबाबांच्या झोळीत हात घालणा-याचे कधीच चांगले झाले नाही, असे वकतव्य केले होते. यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाणे समर्थक नाराज होते. त्यामुळे समर्थक कांबळे यांचे काम करणार नसल्याची भुमिका याआधीच जाहीर केली होती. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाक्ष्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुर्वीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण ससाणे यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काल ससाणे समर्थकांचा मेळावा घेतला होता. तर आज शिर्डी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर ससाणे यांनी राजीनामा दिला.
करण ससाणे यांचे वडील दिवगंत आमदार जयंत ससाणे साईबाबा संस्थानचे सात वर्षे अध्यक्ष होते.