अहमदनगर मतदारसंघात 11 वाजेपर्यत 19.12 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:26 AM2019-04-23T10:26:42+5:302019-04-23T13:13:18+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
अहमदनगर :अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजेपर्यत 19.12 टक्के मतदान मतदारसंघात झाले.
राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप, आदर्श गाव हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी सकाळीच मतदान केले. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी सकाळी विशाल गणपतीचे दर्शन घेऊन मतदान केंद्राला भेटी दिल्या. विखे यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात नाव आहे, त्यामुळे त्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदारन करता येणार नाही.
ऊन्हाचा कडाका सुरू होण्याआधीच अनेक मतदान केंद्रावर सकाळीच रांगा दिसून आल्या. सखी मतदान केद्रावर महिलांनी रागोळ्या काढून केंद्राभोवती सजावट केली. ग्रामीण भागातही ज्येष्ठांनी सकाळीच मतदान केले. शहरातही सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर अनेक केंद्रावर मतदान केले.
राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरातील सारसनगर केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी सहकुटुंब कर्जतमध्ये बजावला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी नगर तालुक्यातील बु-हाणनगर येथे मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांनाह सारसनगर केंद्रावर मतदान केले. आदर्शगावचे पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारमध्ये सकाळीच मतदान केले.