अहमदनगर मतदारसंघात ठिकठिकाणी मतदान यंत्रात बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:53 AM2019-04-23T11:53:38+5:302019-04-23T11:55:24+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला.
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.
श्रीगोंदा तालुक्यातील डोकेवाडी मतदान केंद्रावर अर्धा तास उशीरा मतदान सुरू झाले. जामखेड तालुक्यातील नान्नज येथील मतदान यंत्रात बिघाड झाला होता. तहसिलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांची मतदान केंद्राला भेट देत मशील बदलले. पारनेर शहरातही मतदान यंत्रे सुरु न झाल्याने पंधरा मिनीटे उशिराने मतदानास सुरूवात झाली. जामखेडमध्ये पिंपरखेड येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रांत सकाळी ७ वाजल्यापासून बिघाड झाला. दुसरे मतदान यंत्र आणल मात्रे तेही थोड्या वेळात बंद पडले. तिसरे मतदान यंत्र आणले ते सकाळी साडेआठ वाजता सुरू झाले. नगर तालुक्यातील निंबळक येथेही मतदान यंत्र बंद पडले होते. मतदान यंत्र बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले.