Ahmednagar: घारगाव-संगमनेर प्रवासादरम्यान राणीहार, लक्ष्मीहार चोरीला
By शेखर पानसरे | Updated: May 2, 2024 14:03 IST2024-05-02T14:02:34+5:302024-05-02T14:03:57+5:30
Ahmednagar Crime News: परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना नाशिक येथील महिलेचे १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली. ही घटना बुधवारी (दि.०१) दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घारगाव ते संगमनेर बसमध्ये प्रवासादरम्यान घडली.

Ahmednagar: घारगाव-संगमनेर प्रवासादरम्यान राणीहार, लक्ष्मीहार चोरीला
- शेखर पानसरे
संगमनेर - परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना नाशिक येथील महिलेचे १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली. ही घटना बुधवारी (दि.०१) दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घारगाव ते संगमनेर बसमध्ये प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोनाली संजय पवार (वय ४७, रा. मनोहर कॉलनी, समर्थ नगर, पारिजात नगर, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सोनाली पवार या बसने घारगाव येथून संगमनेर येथे येत होत्या. दरम्यान त्यांच्या पाकिटात ठेवलेला २६ ग्रॅम सोन्याचा राणीहार, २५ ग्रॅम सोन्याचा लक्ष्मीहार, एक ग्रॅम सोन्याची नथ असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी संगमनेर शहर पोलिस ठाणे गाठले, त्यांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस नाईक लता जाधव अधिक तपास करीत आहेत.