अहमदनगर जिल्ह्यात १२५० कंत्राटी आरोग्य कर्मचारी केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:26 AM2021-09-16T04:26:55+5:302021-09-16T04:26:55+5:30

अहमदनगर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाच्या काळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेचे कारण ...

In Ahmednagar district, 1250 contract health workers were reduced | अहमदनगर जिल्ह्यात १२५० कंत्राटी आरोग्य कर्मचारी केले कमी

अहमदनगर जिल्ह्यात १२५० कंत्राटी आरोग्य कर्मचारी केले कमी

अहमदनगर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाच्या काळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेचे कारण देत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे तसेच कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही काम नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

१) मार्च २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर एकूण किती आरोग्य कर्मचारी कंत्राटी तत्वावर नेमण्यात आले? - १४००

२) १० सप्टेंबर २०२१पर्यंत एकूण किती कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले? - १२५०

जिल्हा - अहमदनगर

कमी केलेले एकूण कर्मचारी - १२५०

डॉक्टर - १५०

परिचारिका - २००

शिपाई - २००

तंत्रज्ञ - १००

रुग्णवाहिका चालक - १००

इतर - २५०

ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमधील सेवा देण्यासाठी वरील कर्मचारी नियुक्त केले होते. सध्या कोविड सेंटर बंद असून, शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. सध्या काही प्रमाणात रुग्ण असले तरी त्यांची सेवा करण्यास नियमित कर्मचारी पुरेसे असल्याने आरोग्य सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही.

------------

Web Title: In Ahmednagar district, 1250 contract health workers were reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.