अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नगरमध्ये खलबते; २७ जानेवारीला मुंबईत शरद पवार घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:28 PM2021-01-24T16:28:25+5:302021-01-24T16:28:59+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार रविवारी नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँक  निवडणुकीविषयी माहिती घेतली. यावर चचार् करुन त्यांनी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊन रणनीत ठरवू, असे सांगितले.

Ahmednagar District Bank elections in the city; Sharad Pawar to hold meeting in Mumbai on January 27 | अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नगरमध्ये खलबते; २७ जानेवारीला मुंबईत शरद पवार घेणार बैठक

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नगरमध्ये खलबते; २७ जानेवारीला मुंबईत शरद पवार घेणार बैठक

 अहमदनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार रविवारी नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँक  निवडणुकीविषयी माहिती घेतली. यावर चचार् करुन त्यांनी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊन रणनीत ठरवू, असे सांगितले.

   लॉकडाऊन नंतरच्या मोठ्या कालावधीने खा.शरद पवार नगरमध्ये आल्याने आमदार अरुण जगताप,आमदार संग्राम जगताप,  सचिन जगताप यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून सत्कार केला. 

  यावेळी खा.शरद पवार यांनी उपस्थित सर्व नेत्यांबरोबर जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करून परिस्थितीची माहिते घेतली. महाआघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहून ही निवडणूक लढवावी अशी सूचना करून त्यांनी बँकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ असे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी शेखर घुले, पांडुरंग अभंग यांनी निवडणुकीची माहिती दिली. 

 

Web Title: Ahmednagar District Bank elections in the city; Sharad Pawar to hold meeting in Mumbai on January 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.