अहमदनगर जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता, राहुरी कृषी विद्यापीठाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:00 PM2018-06-29T17:00:10+5:302018-06-29T17:00:21+5:30
अहमदनगर जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै यादरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै यादरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारत मौसम विज्ञान विभागाच्या आंदाजानुसार जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सीअस राहील, असा आंदाज वर्तविण्यात आला आहे.
कमाल आर्द्रता ७८ ते ८३ टक्के राहील़ किमान आर्द्रता ४५ ते ५० टक्के राहील. वा-याचा ताशी वेग ११ ते १९ किलोमिटर राहील असा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ मिली पावसाची नोंद झाली आहे. झालेल्या पावसावर खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. खरीपासाठी नजिकच्या काळात आणखी पावसाची गरज आहे. गेल्या वर्षीच्या जूनच्या सरासरी इतका पाऊस झाला आहे.