अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:17 PM2018-05-08T19:17:50+5:302018-05-08T19:18:14+5:30

अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात ९ ते १४ मे यादरम्यान उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात शेवगाव येथे येत्या पाच दिवसात सर्वाधिक ४१.३ ते ४३.१ अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार बाष्पीभवन १० ते १४ मिलीमिटर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़.

In Ahmednagar district, the intensity of heat will increase in the next five days | अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार

अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार

ठळक मुद्दे९ ते १४ मे यादरम्यान उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे

राहुरी: अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात ९ ते १४ मे यादरम्यान उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात शेवगाव येथे येत्या पाच दिवसात सर्वाधिक ४१.३ ते ४३.१ अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार बाष्पीभवन १० ते १४ मिलीमिटर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़.
येत्या पाच दिवसात अहमदनगर जिल्ह्यात तामपानात १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तालुका निहाय तापमान अंशामध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे, जामखेड व कर्जत ४१ ते ४२.८, श्रीगोंदा ४० ते ४१, नगर शहर ३९.९ ते ४१.६, कोपरगाव ३९ ते ४१.६, नेवासा ४१ ते ४२.६, पारनेर ३९ ते ४०.८, राहुरी ४० ते ४१.८, पाथर्डी ४१.१ ते ४२.९, राहता ३९.८ ते ४१.७, संगमनेर ३९.२ ते ४१.५, अकोले ३७.६ ते ४१.१ ,श्रीरामपूर ४०.३ ते ४२.०

अहमदनगर परिसरात पुढील पाच दिवस कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सीअस राहील़ किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील़ कमाल आर्द्रता ६० ते ६८ टक्के असेल़ किमान आर्द्रता २० ते २३ टक्के राहील़ वा-याचा ताशी वेग १३ ते १७ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. उन व वा-यामुळे बाष्पीभवन १० ते १४ मिलीमिटर राहील़ - रविंद्र आंधळे, सहसमन्वयक, ग्रामीण कृषि मॅसेज सेवा, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी़

 

Web Title: In Ahmednagar district, the intensity of heat will increase in the next five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.