अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:18 AM2018-03-16T10:18:42+5:302018-03-16T10:20:57+5:30
काल सायंकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली असून पहाटेपासून पावसाने जिल्हा व्यापला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वतर्विण्यात येत आहे.
अहमदनगर : काल सायंकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली असून पहाटेपासून पावसाने जिल्हा व्यापला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वतर्विण्यात येत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हाभर ढगाळ हवामान होते. गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ठराविक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील काही भागात गुरुवारी पाऊस झाला. पारनेर तालुक्यातील जवळे, निघोज परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतात काढून पडलेला कांदा छाकण्यासाठी धावपळ उडाली. मात्र आज पहाटेपासून हलक्या पावसाने जिल्हा व्यापला आहे. या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली आहे. शेतामध्ये गहू, हरभरा, कांदा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्वारी काढणी पूर्ण झाली असली तरी कडबा खराब होणार आहे. यासह डाळींबाची फळधारणा होत असल्याने त्यासही फटका बसणार आहे. नगर शहराचे किमान तापमानही २० अंश सेल्सिअस पर्यत घसरले आहे. जिल्हा प्रशासनाने शेतक-यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.