Ahmednagar: निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करा, ॲड. अजित काळे यांची मागणी

By सचिन धर्मापुरीकर | Published: October 9, 2023 12:34 PM2023-10-09T12:34:48+5:302023-10-09T12:35:42+5:30

Ahmednagar: निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्यांच्या पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी वाकडी जवळील धनगरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत बोलताना केली.

Ahmednagar: Do the work in the tail area of the left canal immediately - Adv. Ajit Kale | Ahmednagar: निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करा, ॲड. अजित काळे यांची मागणी

Ahmednagar: निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करा, ॲड. अजित काळे यांची मागणी

- सचिन धर्मापूरीकर
अहमदनगर - निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्यांच्या पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी वाकडी जवळील धनगरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत बोलताना केली.

उत्तर नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील ०६ गावांसह १८२ अवर्षणग्रस्त गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील विक्रांत रुपेंद्र काले व समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांच्या जनहित याचिका व जनरेट्यामुळे मार्गी लागले असून दि.३१ मे रोजी त्याची तब्बल ०६ मुदत वाढीनंतर राज्य सरकारला व जलसंपदा विभागाला डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी लागली आहे. दरम्यान विलंबामुळे जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले गेले आहे.

कालवा कृती समितीचे विधिज्ञ अजित काळे यांचा वाकडी नजीक धनगरवाडी येथे कालवा पाहणी दौरा आयोजित केला होता, त्यावेळी ते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते.

याप्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, संघटक नानासाहेब गाढवे, रावसाहेब मासाळ, राजेंद्र थोरात, राजू नामदेव रक्टे, साहेबराव आदमाने, अनिल पुंजा रक्टे, दगडू रक्टे, आलाराम रक्टे, अनिल भोंडे, पुंजाजी रक्टे, अशोक लांडे, बाळासाहेब शेळके, अण्णा आदमाने, धनगरवाडी व लांडेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

डाव्या कालव्याच्या एस्केप उभारणी व शिर्ष विमोचकाचे (एच.आर.) बांधकाम निविदा दि.१३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या असून उर्वरित कोपरगाव व तळेगाव दिघे ब्रँच चाऱ्या अजून जागोजागी मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे. या दुष्काळी टापुतील चाऱ्या आणि वरील कामांची निविदा प्रसिद्ध करून सदर कामे तातडीने पूर्ण करणे व त्या भागातील पाझरतलाव, साठवण बंधारे, बंडीग, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदीत पाणी सोडले तर शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचविणे आणि चारा पिके घेणे सोपे होऊन दुष्काळ सुसह्य होणार आहे. त्यामुळे वरील कामे तातडीने हाती घेऊन त्याची निविदा निळवंडे कालवा कृती समितीच्या वरील जनहित याचिकेतील मागणी प्रमाणे पूर्ण होणे गरजेचे आहे. तरी वरील मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही ॲड.अजित काळे यांनी शेवटी केली आहे.

त्यावेळी जलसंपदा विभागाचे माजी अभियंता अकीलभाई शेख, कनिष्ठ अभियंता संदीप साबळे, निखिल आदिक आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Ahmednagar: Do the work in the tail area of the left canal immediately - Adv. Ajit Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.