माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने केला एडिट; संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
By शेखर पानसरे | Updated: May 21, 2024 21:42 IST2024-05-21T21:42:04+5:302024-05-21T21:42:23+5:30
Ahmednagar News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून तो फोटो समाजमाध्यमांतून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक तसेच अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.

माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने केला एडिट; संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
- शेखर पानसरे
संगमनेर - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून तो फोटो समाजमाध्यमांतून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक तसेच अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. त्या संदर्भाने मंगळवारी (दि. २१) संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.
उद्धव सेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, समन्वयक दीपक साळुंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, माजी नगरसेवक नूरमोहम्मद शेख, निखिल पापडेजा, हैदरअली सय्यद, कमलेश उनवणे, अजीज मोमीन, अमोल डुकरे, बंडू म्हाळस, नितेश शहाणे, त्रिलोक कतारी, मोहसीन शेख, पंकज पडवळ, लाला शेख आदी यावेळी उपस्थित होते.
एका व्हॉटस्ॲप समूहात पोस्ट करण्यात आलेला फोटो आक्षेपार्ह आहे, आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचप्रमाणे दोन धर्मात वाद निर्माण करण्याचा संबंधित व्यक्तीचा उद्देश आहे. त्यामुळे कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही केल्याचे उद्धव सेनेचे माजी शहरप्रमुख कतारी यांनी सांगितले.