स्वाक्षरीयुक्त  ‘सातबारा’त अहमदनगर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:34 AM2018-11-05T06:34:23+5:302018-11-05T06:34:55+5:30

सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू झाला असून अहमदनगर जिल्हा त्यात आघाडीवर आहे.

 Ahmednagar leads the signature 'Satbara' | स्वाक्षरीयुक्त  ‘सातबारा’त अहमदनगर आघाडीवर

स्वाक्षरीयुक्त  ‘सातबारा’त अहमदनगर आघाडीवर

पुणे : सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू झाला असून अहमदनगर जिल्हा त्यात आघाडीवर आहे. पुणे सातव्या क्रमांकावर तर मुंबईसह सिंधूदूर्ग व रत्नागिरी जिल्हा पिछाडीवर आहे. राज्यात आतापर्यंत ३९ लाख २४ हजार ६४८ डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
सातबारा संगणकीकरणात चावडी वाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, आॅनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा असे विविध टप्पे आहेत. त्यातच संगणकीकरणाच्या प्रक्रियेत काही चुका झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने राज्यातील सर्व जमीनधारक व शेतकºयांना नोव्हेंबर अखेरपर्यंत चुका दुरूस्त करून घेण्याची संधी दिली आहे.
परिणामत: डिजिटल स्वाक्षरीच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५ लाख ५ हजार ५९४ सातबारा उतारे तयार झाले असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत देण्यात आले केवळ ७ उतारे

अहमदनगर (५,०५,५९४), रायगड (२,८५,२६४), उस्मानाबाद (२,७८,२८०), यवतमाळ (२,७६,४६६), अमरावती (२,३९,६३४), नाशिक (२,३४,९७३), पुणे (२,१२,२८३), बुलडाणा (२,०१,९९८), बीड (२,००,०८७), अकोला (१,८६,७२६), जालना (१,८५,७९२), वाशिम (१,१९,४३१), कोल्हापूर (११७२२७), हिंगोली (१०७२३२), सोलापूर (१०५२८४), लातूरं (९०८७२), गोंदिया (७६९५६), परभणी (५९६२९), भंडारा (५६५०७), ठाणे (५४,१५४), वर्धा (५३,८१५), जळगाव (४८,२७६), नागपूर (४७,८८८), सांगली (४०,०००), नंदूरबार (३९,७३६), औरंगाबाद (३२,५०९), गडचिरोली (३१,९८५), चंद्रपूर (२५,०७९), धुळे (३,९९५), सातारा (३,६७५), पालघर (३,१८७), नांदेड (१०७), मुंबई (७), सिंधूदूर्ग (०), रत्नागिरी (०)

Web Title:  Ahmednagar leads the signature 'Satbara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.