अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: धनशक्तीमुळेच सुजय विखेंचा विजय : संग्राम जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:03 PM2019-05-24T14:03:16+5:302019-05-24T14:03:24+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे झालेला विजय धनशक्तीमुळे झाला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही योगदान विखे यांच्या विजयामध्ये आहे.
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे झालेला विजय धनशक्तीमुळे झाला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही योगदान विखे यांच्या विजयामध्ये आहे. धनशक्तीच्या जोरावर विखेंना एवढे मताधिक्य मिळाले असल्याचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी पराभवाची कारणे सांगितले.
जगताप म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी कालपासूनच सुरू केली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत गावागावांत पोहोचलो. लोकांनी मोठ्या प्रमाणात माझ्यावर विश्वास दाखवला. दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मोदींचा चेहरा आणि धनशक्तीमुळे मिळालेला आहे. कुठेही पक्षांतर करण्याचा विचार आपल्या मनात नसल्याचेही जगताप यांनी सांगितले.