अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: 14 वी फेरी : भाजपाचे डॉ.सुजय विखे यांची 1 लाख 54 हजार मतांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 01:35 PM2019-05-23T13:35:41+5:302019-05-23T13:36:18+5:30
Ahmednagar Lok Sabha Election Results 2019
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर १ लाख ५४ हजार मतांची आघाडी मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना त्यांनी पिछाडीवर पाडले आहे.
सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच ठेवली आहे. चौदाव्या फेरीअखेर १ लाख ५४ हजार ६९७ मतांची आघाडी घेतली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली.
चौदाव्या फेरीअखेरीस डॉ.सुजय विखे यांना ३ लाख ८५ हजार ८२१ तर आमदार संग्राम जगताप २ लाख ३१ हजार १२४ मते मिळाली आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.२६ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना ६ लाख ३ हजार ९७६ मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना ३ लाख ९५ हजार ५६९ मतं मिळाली होती.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले.