अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. सुजय विखेंचे तुफान : 3 लाख मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:56 PM2019-05-23T21:56:47+5:302019-05-23T22:45:10+5:30

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019: Dr. Sujay Wichhen's storm: won by 3 lakh votes | अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. सुजय विखेंचे तुफान : 3 लाख मतांनी विजयी

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. सुजय विखेंचे तुफान : 3 लाख मतांनी विजयी

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा तब्बल 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची बनवली होती. पवारांनी जोर लावूनही राष्ट्रवादीला मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली.   
 सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच डॉ.विखे यांनी आघाडी घेतली. डॉ.सुजय विखे यांना 7 लाख 04 हजार 660 मते मिळाली तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मते मिळाली.  सर्वच मतदारसंघातून विखे यांना लीड मिळाली आहे. सवार्धिक लीड राहुरी मतदारसंघातून मिळाले. 
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 54 हजार 248 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत 64.26 टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना 6 लाख 3 हजार 976  मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना 3 लाख 95 हजार 569 मतं मिळाली होती.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये 63.40 टक्के, राहुरी66.77 टक्के, पारनेर 66.10 टक्के, अहमदनगर शहर60.25 टक्के, श्रीगोंदा 64.75 तर कर्जत-जामखेडमध्ये 64.10० टक्के मतदान झाले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होती. काँग्रेसच्या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. निवडणुकीपुर्वी ही जागा काँग्रेसला मिळण्यासाठी विरोेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र शरद पवार यांनी विखे यांना जागा सोडली नाही. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी भाजपात दाखल होत निवडणुक लढवली. भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून डॉ.सुजय विखे यांना मैदानात उतरवले तर राष्ट्रवादीने ऐनवेळी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. मात्र या सर्व लढतीत डॉ. सुजय विखे यांनी एकतर्फी विजय मिळविला. 

ही पाहा आकडेवारी

विधानसभाडॉ.सुजय विखे (BJP)आ.संग्राम जगताप(NCP)विखे यांचे लीड
कर्जत-जामखेड1,02,341+78,215+24,126+
श्रीगोंदा1,09,109+78,511+30,598+
नगर शहर1,08,860+55,738+53,122+
पारनेर1,17,081+80,372+36,707+
राहुरी1,23,417+53,501+69,916+
शेवगाव-पाथर्डी1,27,700+68,086+59,614+
एकूण 7,04,6604,23,1862,81,474 (अंतिम आकडेवारीनुसार)

 

Web Title: Ahmednagar Lok Sabha Election Results 2019: Dr. Sujay Wichhen's storm: won by 3 lakh votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.