अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:29 IST2020-08-20T14:27:51+5:302020-08-20T14:29:33+5:30
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला आहे. अहमदनगर महापालिकेला केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 6000 गुणांपैकी चार हजार 153 गुण मिळाले असून अहमदनगर शहर देशात 40 सावे आले आहे.

अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला आहे. अहमदनगर महापालिकेला केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 6000 गुणांपैकी चार हजार 153 गुण मिळाले असून अहमदनगर शहर देशात 40 सावे आले आहे.
अहमदनगर महापालिकेने नगर शहरात विविध ठिकाणी राबवलेल्या स्वच्छता अभियाना अंतर्गत केलेल्या उपाययोजनांचा उपाययोजनांसाठी हे गुण मिळाले आहेत. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महापालिकेने सादर केलेल्या माहितीनुसार केंद्रीय पथकाने नगर शहरातील घरोघरी जाऊन संकलित केला जाणारा कचरा शौचालय गटारी बांधकामाचा राडारोडा खत प्रकल्प जलशुद्धीकरण प्रकल्प आदी कामे केली आहेत. या कामांसाठी महापालिकेला हे गुण मिळाले आहेत.