अहमदनगर महापालिकेचे कचरा संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 08:02 PM2018-05-10T20:02:29+5:302018-05-10T20:03:13+5:30

कचरा संकलन करणारी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादारांना वेतनाचे पैसे न दिल्याने त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील कचरा जागेवरच पडून आहे.

The Ahmednagar Municipal Corporation's garbage collection was postponed the next day | अहमदनगर महापालिकेचे कचरा संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्पच

अहमदनगर महापालिकेचे कचरा संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्पच

ठळक मुद्देसभापती वाकळे-उपायुक्तांचे प्रयत्न निष्फळ

अहमदनगर : कचरा संकलन करणारी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादारांना वेतनाचे पैसे न दिल्याने त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील कचरा जागेवरच पडून आहे. शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी फरार झाल्याने स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी पुढाकार घेत पुरवठादारांशी चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरल्याने प्रशासन-ठेकेदार यांच्यातील वाद थेट जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात गेला आहे.
कचरा संकलन करण्यासाठी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादार संस्थांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे दीड कोटी रुपयांची वेतनाची देयके थकली आहेत. बिलासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पैसै मिळत नसल्याने पुरवठादारांनी वाहने व मजुरांचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कचरा संकलन बंद आहे. शहरातील अनेक भागात कचरा जागेवरच असून वाहनेही जागेवरच ठप्प आहेत. अनेक भागात कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडला आहे. कंटेनरमधील कचरा ओव्हर फ्लो झाला आहे.
केडगाव दगडफेकप्रकरणी सध्या पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचे महापालिकेतील पदाधिकारी फरार आहेत. महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम हेही फरार झाले आहेत. त्यामुळे महापौर दालनात शुकशुकाट आहे. गुन्हा दाखल नसला तरी नस्ती चौकशी नको म्हणून उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृहनेते गणेश कवडे यांनीही महापालिकेकडे पाठ फिरवली आहे. आयुक्तांचा कार्यभार जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे आहे. तसेच महापालिकेत सक्षम अधिकाºयांची वानवा असल्याने पुरवठादारांनी सभापती बाबासाहेब वाकळे यांचे दालन गाठले. वाकळे यांनी प्रभारी मुख्य लेखाधिकारी अंबादास साळी यांच्याशी चर्चा केली. प्रभारी उपायुक्त दिगंबर कोंडा, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. एन.एस. पैठणकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आदर्श एंटरप्रायजेसच्या संचालकांनी केलेल्या मागणीनुसार १२ लाख रुपयांचा धनादेश काढण्याचा तोडगा निघाला. मात्र ९० लाखांचे बिल असताना किमान पन्नास टक्के रक्कम अदा करण्याची मागणी केली. वाहनांवरील मजुरांचे पुरवठादार रौनक एजन्सी यांचेही बिल देण्यास प्रशासन असमर्थ ठरले. त्यामुळे सायंकाळी पैठणकर यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे धाव घेतली.

शहरातील कचरा जागेवरच
कचरा संकलन ठप्प झाल्याने शहरातील कचरा सलग दुसºया दिवशीही जागेवरच होता. कचराकुंड्या ओव्हर फ्लो झाल्या होत्या. तर रस्त्यावर कचरा पसरला होता. काही भागातील कचरा अनेक दिवसांपासून उचलला न गेल्याने शहरात दुर्गंधी पसरली आहे.

 

Web Title: The Ahmednagar Municipal Corporation's garbage collection was postponed the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.