Ahmednagar Municipal Election Results 2018 live : त्रिशंकू स्थिती, भाजप-सेना सत्तेत येण्याची शक्यता

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 09:37 AM2018-12-10T09:37:06+5:302018-12-10T14:08:19+5:30

अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी  रविवारी (9 डिसेंबर) मतदान झाले. सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला ...

Ahmednagar Municipal Election Result 2018 live | Ahmednagar Municipal Election Results 2018 live : त्रिशंकू स्थिती, भाजप-सेना सत्तेत येण्याची शक्यता

Ahmednagar Municipal Election Results 2018 live : त्रिशंकू स्थिती, भाजप-सेना सत्तेत येण्याची शक्यता

अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी  रविवारी (9 डिसेंबर) मतदान झाले. सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी असे प्रमुख तीन पक्ष उतरले आहेत. याशिवाय 106 अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान आहे. पहिला निकाल साधारण 11 वाजता तर दुपारी 2 वाजता सगळं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस आघाडी, भाजपा आणि शिवसेना, या तिन्ही पक्षांनी बहुतांश प्रभागात तुल्यबळ उमेदवार दिले. त्यामुळे तिरंगी लढती पाहायला मिळाली. या निवडणुकीत भाजपाने प्रथमच प्रचारात आघाडी घेतली. राष्ट्रवादीने नेत्यांच्या सभा न घेता घरोघरी जाऊन प्रचार केला. भाजपाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांची, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा झाली. काँग्रेसकडून डॉ. सुजय विखे निवडणुकीत सक्रिय होते. सेनेचे आमदार अनिल राठोड यांनी खिंड लढविली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेली तीनशे कोटींची घोषणाही चांगलीच गाजली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी काँग्रेसचे पाच उमेदवार भाजपामध्ये गेल्याने काँग्रेसची नाचक्की झाली. यासह अनेक मुद्यांवरून ही निवडणूक चांगलीच गाजली असून, नगरकर कुणाला कौल देतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

LIVE

Get Latest Updates

10 Dec, 18 : 04:28 PM

शिवसेना 24, भाजपा 14, काँग्रेस-राष्ट्रवादी 23, इतर 7 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 02:44 PM

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा छिंदम विजयी

10 Dec, 18 : 02:38 PM

श्रीपाद छिंदम विजयाच्या दिशेने, 15 फेऱ्यांअखेर 1000 मतांची आघाडी

10 Dec, 18 : 02:18 PM

अहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार

10 Dec, 18 : 02:13 PM

13 व्या फेरी अखेर खासदार पुत्र सुवेंद्र गांधी 759 मतांनी तर सून दीप्ती गांधी 1739 मतांनी पिछाडीवर

10 Dec, 18 : 02:08 PM

अहमदनगर - त्रिशंकू स्थिती, भाजप-सेना सत्तेत येण्याची शक्यता

10 Dec, 18 : 01:36 PM

नगरमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याचे महाजनांचे संकेत

10 Dec, 18 : 01:28 PM

अहमदनगरमध्ये आम्ही कमी पडलो, पण इथे युतीशिवाय सरकार स्थापन होणार नाही, मुख्यमंत्री, रावसाहेब दानवे निर्णय घेतील - गिरीश महाजन

10 Dec, 18 : 01:26 PM

अहमदनगर : पहिले महापौर भगवान फुलसौंदर पराभूत, सेनेला झटका

10 Dec, 18 : 01:21 PM

भाजपाचे खासदार दिलीप गांधींचा मुलगा आणि सून दोघे पिछाडीवर

10 Dec, 18 : 01:09 PM

अहमदनगर : राष्ट्रवादीने विजयाचे खाते खोलले

10 Dec, 18 : 01:03 PM

अहमदनगर : प्रभाग 14 राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी. शितल संग्राम जगताप, प्रकाश भागानगरे, मीना चोपडा, गणेश भोसले विजयी

10 Dec, 18 : 01:03 PM

अहमदनगर : प्रभाग 14 राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी. शितल संग्राम जगताप, प्रकाश भागानगरे, मीना चोपडा, गणेश भोसले विजयी

10 Dec, 18 : 12:59 PM

अहमदनगर : श्रीपाद छिंदम 400 मतांनी आघाडीवर

10 Dec, 18 : 12:54 PM

अहमदनगर : प्रभाग 10 मध्ये बसपा आघाडीवर. अ मध्ये अक्षय उनवणे, ब मध्ये आश्विनी जाधव, क मध्ये अनिता पंजाबी, ड मध्ये शेख मुद्दसर जहागीर  हे चौघेही आघाडीवर

10 Dec, 18 : 12:47 PM

अहमदनगर : केडगावमधील ८ जागेपैकी ६ जागांवर शिवसेना आघाडीवर

10 Dec, 18 : 12:45 PM

शिवसेना शहराध्यक्ष दिलीप सातपुते 250 मतांनी पिछाडीवर, भाजपाचे मनोज कोतकर आघाडीवर

10 Dec, 18 : 12:38 PM

अहमदनगर महानगरपालिका त्रिशंकू स्थितीत, शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत

10 Dec, 18 : 12:36 PM

त्रिशंकू स्थिती, भाजपा-सेना सत्तेत येण्याची शक्यता

10 Dec, 18 : 12:27 PM

अहमदनगर महानगरपालिका त्रिशंकू स्थितीत

10 Dec, 18 : 12:19 PM

दीप्ती गांधी 449 मतांनी पिछाडीवर, सुवेंद्र गांधी 142 मतांनी आघाडीवर

10 Dec, 18 : 12:13 PM

अहमदनगर - श्रीपाद छिंदम 150 मतांनी पिछाडीवर, मनसेच्या पोपट पाखरे यांना आघाडी

10 Dec, 18 : 12:10 PM

भाजपा 18, शिवसेना 17, काँग्रेस-राष्ट्रवादी 25, इतर 8 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 12:08 PM

अहमदनगर : शिवसेना 19, भाजपा 19, आघाडी 22, इतर 8

10 Dec, 18 : 12:06 PM

शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम आघाडीवर, दिप्ती गांधी पिछाडीवर

10 Dec, 18 : 11:56 AM

आमदार शिवाजी कर्डीले यांची मुलगी ज्योती गाडे आघाडीवर

10 Dec, 18 : 11:52 AM

भाजपा खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी आघाडीवर

10 Dec, 18 : 11:48 AM

केडगावमध्ये कॉंग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले मनोज कोतकर 219 मतांनी आघाडीवर

10 Dec, 18 : 11:44 AM

शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम 160 आघाडीवर, तर त्यांच्या विरोधातील खा. दिलीप गांधी यांची सून दिप्ती गांधी पिछाडीवर

10 Dec, 18 : 11:40 AM

अहमदनगर : भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्या सून दिप्ती गांधी 160 मतांनी पिछाडीवर

10 Dec, 18 : 11:32 AM

भाजपा 19, शिवसेना 19, काँग्रेस-राष्ट्रवादी 22, इतर 8 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 11:30 AM

भाजपा 25, शिवसेना 13, काँग्रेस-राष्ट्रवादी 13, इतर 3 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 11:24 AM

अहमदनगरध्ये श्रीपाद छिंदम 300 मतांनी पिछाडीवर, प्रभाग 9 क मधून छिंदम मागे

10 Dec, 18 : 11:23 AM

शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम 300 मतांनी पिछाडीवर

10 Dec, 18 : 11:20 AM

अहमदनगर - प्रभाग क्रमांक 2 मध्ये चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादी आघाडीवर, भाजपा पिछाडीवर

10 Dec, 18 : 11:19 AM

अहमदनगर : भाजप 20, शिवसेना 12, काँग्रेस-राष्ट्रवादी 12, इतर 3 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 11:15 AM

अहमदनगर - प्रभाग ११ मधून भाजपाचे सुवेंद्र दिलीप गांधी आघाडीवर : खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र

10 Dec, 18 : 11:10 AM

 अहमदनगरमध्ये  प्रभाग 11 मध्ये भाजपाचे सुरेंद्र गांधी आघाडीवर

10 Dec, 18 : 11:07 AM

अहमदनगरमध्ये भाजपाची मोठी आघाडी, शिवसेना दुसऱ्या स्थानावर

10 Dec, 18 : 10:55 AM

अहमदनगर महानगरपालिका - भाजपा 16, शिवसेना 8, काँग्रेस-राष्ट्रवादी 9, इतर 3

10 Dec, 18 : 10:55 AM

शिवसेना 5, भाजप 8, काँग्रेस-राष्ट्रवादी 5, इतर 3 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 10:55 AM

अहमदनगर महानगरपालिका - शिवसेना 5, भाजपा 13, काँग्रेस-राष्ट्रवादी 8, इतर 3 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 10:39 AM

अहमदनगर महानगरपालिका - शिवसेना 4, भाजपा 6, काँग्रेस 5, इतर 2 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 10:21 AM

अहमदनगर: मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी

10 Dec, 18 : 10:21 AM

अहमदनगर महानगरपालिका - पहिला कल हाती, भाजप दोन जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 : 10:18 AM

Ahmednagar Municipal Election 2018 : अहमदनगर महापालिका पुन्हा त्रिशंकू?



 

10 Dec, 18 : 10:14 AM

अहमदनगर : प्रत्येक उमेदवाराच्या घरी पोलीस बंदोबस्त तैनात

10 Dec, 18 : 10:14 AM

अहमदनगर : शहरातील भवानीनगर येथे मतमोजणीस सुरुवात

Web Title: Ahmednagar Municipal Election Result 2018 live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.