Ahmednagar: सार्वजनिक रहदारीला अडथळा;कोपरगावात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा
By रोहित टेके | Updated: May 4, 2023 09:21 IST2023-05-04T09:19:41+5:302023-05-04T09:21:15+5:30
Ahmednagar: कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण करीत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या डंपर चालकावर (क्र. एम. एच. १५ डी. के. ७३७५) पोलिसांनी बुधवारी (दि. ३) कारवाई करत उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagar: सार्वजनिक रहदारीला अडथळा;कोपरगावात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा
रोहित टेके -
अहमदनगर - कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण करीत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या डंपर चालकावर (क्र. एम. एच. १५ डी. के. ७३७५) पोलिसांनी बुधवारी (दि. ३) कारवाई करत उशिरा गुन्हा दाखल केला आहे. सचिन अशोक जाधव (वय-३० रा. मुसळगाव एम.आय. डी. सी. ता. सिन्नर जि.नाशिक)असे गुन्हा दाखल केलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करीत आहेत.