अहमदनगर : प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान खा. सुजय विखे-पाटलांचं काय होणार?

By सुदाम देशमुख | Published: April 18, 2023 05:37 PM2023-04-18T17:37:55+5:302023-04-18T17:40:22+5:30

विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचे आता काय होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Ahmednagar Prof Ram Shinde wants to contest Lok Sabha 2024 incumbent What will happen to Sujay Vikhe Patal | अहमदनगर : प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान खा. सुजय विखे-पाटलांचं काय होणार?

अहमदनगर : प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान खा. सुजय विखे-पाटलांचं काय होणार?

अहमदनगर : भाजपचे विधान परिषदेतील आमदार, माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे हे २०२४ मध्ये अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. तशी इच्छाच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. 

२०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक लढविण्यासही मी इच्छुक आहे. पक्षाने तसा आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणार आहे. २०१४ मध्ये दिलीप गांधी, प्रताप प्रताप ढाकणे आणि मी स्वतः इच्छुक होतो. मात्र त्यावेळी दिलीप गांधी यांना उमेदवारी निश्चित झाली. २०१९ मध्ये मी लोकसभा लढवावी अशी कार्यकर्ते आणि काही आमदारांची देखील इच्छा होती. मात्र त्यावेळी डॉक्टर सुजय विखे यांचा भाजपात प्रवेश झाला आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने प्रयत्न केल्याचे शिंदे यांनी सांगितलं.

राज्यसभेसाठी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाने सांगितले होते.  तशी मी तयारी केली होती. मात्र ऐनवेळी मला विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करायला सांगितला आणि नंतर मी आमदार झालो  मात्र आता लोकसभा निवडणूक लढवणार आहे याचा राम शिंदे यांनी पुनरुच्चार केला.

 

Web Title: Ahmednagar Prof Ram Shinde wants to contest Lok Sabha 2024 incumbent What will happen to Sujay Vikhe Patal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.