अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडणार, शरद पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 06:03 PM2019-03-01T18:03:04+5:302019-03-01T18:03:20+5:30
अकलूज येथे शुक्रवारी मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते.
सोलापूर- अकलूज येथे शुक्रवारी मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘नगरची जागा काँग्रेसला सोडणार का?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार साहेबांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याचं पवार साहेबांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावरही सडकून टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागेवर निवडणूक लढवू पाहणारे शरद पवार प्रथमच विजयदादांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत स्पष्टपणे बोलले आहेत. ‘विजयदादांचे पुनर्वसन कसे करणार?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, ‘माझ्या जागेवर विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार असल्याचंही पवारांनी जाहीर केलं आहे.