रेड लाईट एरियात जागली माणुसकी, केरळसाठी वेश्यांनी जमवला निधी   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:50 PM2018-08-21T20:50:16+5:302018-08-21T20:52:04+5:30

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी तळागाळातील वर्गही पुढे येत आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, क्रिकेटर्संपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या डेबवाल्यांनी मदत

Ahmednagar sex workers donate money for kerala flood victims | रेड लाईट एरियात जागली माणुसकी, केरळसाठी वेश्यांनी जमवला निधी   

रेड लाईट एरियात जागली माणुसकी, केरळसाठी वेश्यांनी जमवला निधी   

अहमदनगर - केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी तळागाळातील वर्गही पुढे येत आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, क्रिकेटर्संपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या डेबवाल्यांनी मदत दिली, कुठे लग्नाचा खर्च टाळून मदत दिली, कुठे व्हॉट्सअॅप ग्रुपने एकत्र येऊन मदत दिली, हे आपण ऐकले आहे. मात्र, आता केरळच्या मदतीसाठी वेश्यांनीही पुढाकार घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वेश्यांनी केरळच्या मदतीसाठी 21 हजारांची मदत दिली आहे. 

समाजाकडून नेहमीच तुच्छ नजरेने पाहिल्या जाणाऱ्या वेश्यांनी आपल्या कामातून स्वत:ची इमेज वाढवली आहे. नेहमीच शिवी देऊन ज्यांना झिडकारले जाते, त्यांनी आज कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वेश्यांनी पंतप्रधान मदतनिधी केंद्राकडे 21 हजारांची मदत पाठविली असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे महिनाअखेरपर्यंत 1 लाख रुपये जमा करण्याचे त्यांचे उद्धिष्ट आहे. या महिलांच्या समुहाने सोमवारी उप-जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे 21 हजार रुपयांचा चेक जमा केला. 
शहरातील एनजीओ 'स्नेहालय'चे अधिकारी दीपक बुराम यांनी सांगितले की, देहविक्रीच्या व्यवसायाशी संबंधित महिलांनी महिनाअखेपर्यंत 1 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले आहे. ते एक लाख रुपये केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहेत. यापूर्वीही या महिलांनी आपत्तीच्या काळात मदतनिधी उभारला आहे. डिसेंबर 2015 मध्ये चेन्नईत महापूर आला होता. त्यावेळी या महिलांनी 1 लाख रुपये चेन्नईच्या पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून दिले होते, असे बुराम यांनी सांगितले.

Web Title: Ahmednagar sex workers donate money for kerala flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.