अहमदनगरमध्ये पाणी योजनेच्या संपवेलचा स्लॅब कोसळला : ८ कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:42 AM2019-02-12T11:42:34+5:302019-02-12T12:01:30+5:30
नगर तालुक्यातील देहरे येथे अहमदनगर येथील एमआयडीसी पाणी योजनेच्या संपवेलच्या कामाचा स्लॅब कोसळला. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरे येथे अहमदनगर येथील एमआयडीसी पाणी योजनेच्या संपवेलच्या कामाचा स्लॅब कोसळला. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ८ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
देहरे येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला. ८ हजार स्क्वेअर फुटावर स्लॅब टाकण्याचे काम सुरुहोते. सकाळीच स्लॅब टाकण्याचे काम सुरु झाले. स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा स्लॅब कोसळला. त्यामध्ये ८ कामगार जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या कर्मचारी दाखल होत त्यांना अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.