अहमदनगरमध्ये दररोज २० टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 03:49 AM2020-03-01T03:49:07+5:302020-03-01T08:52:03+5:30

महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते.

In Ahmednagar, there is a leak of 5 percent daily | अहमदनगरमध्ये दररोज २० टक्के पाण्याची गळती

अहमदनगरमध्ये दररोज २० टक्के पाण्याची गळती

अण्णा नवथर

अहमदनगर : महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते. तब्बल २० टक्केपाण्याची गळती होत असल्याने मध्यवर्ती शहरात दिवसाआड, तर उपनगरांत ३ ते ४ दिवसांनी पाणी दिले जात आहे.
अहमदनगर शहराची लोकसंख्या साधारण ४ लाखांच्या घरात आहे. महापालिका जलसंपदा विभागाकडून दररोज ७५ एलडी पाणी घेते. प्रति माणशी १३० लिटर पाणी मिळणे अपेक्षित असताना १०० लिटर मिळते. दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. धरण खाली आणि शहर वर, अशी स्थिती असल्याने अन्य शहरांच्या तुलनेत अहमदनगर महापालिकेची पाणी योजना खर्चिक आहे. महापालिकेचे मुळानगर, विळद, नागापूर, वसंत टेकडी ही चार पाणी उपसा केंदे्र आहेत. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या विद्युत पंपांचे वीज बिल दरमहा २ कोटी रुपये येते. दुरुस्तीसाठी येणारा खर्च ४ लाखांच्या घरात आहे. पाणी योजनेचा खर्च मोठा असला तरी त्या तुलनेत पाणीपट्टी वसूल होत नाही. दरवर्षी होणारा तोटा जवळपास १५ कोटींच्या घरात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महापालिकेने पाणीपट्टी दुप्पट करण्याचा ठराव २०१७ मध्ये दिला होता; परंतु त्यास मंजुरी दिली नाही. सध्या महापालिका दीड हजार रुपये पाणीपट्टी आकारते. असे असले तरी पाणीपट्टीचे २० कोटी थकीत आहेत.

107 कोटीची अमृत पाणी योजना

२०१० मध्ये ११६ कोटींची शहर सुधारित पाणी योजना, तर २०१७ मध्ये १०७ कोटींची अमृत पाणी योजना मंजूर आहेत; पण त्या अर्धवट असल्याने कमी पुरवठा होतो. शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेतून नगर शहरातील १९ जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे; परंतु जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे कुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत.

Web Title: In Ahmednagar, there is a leak of 5 percent daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.