Ahmednagar: साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण; ३ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

By साहेबराव नरसाळे | Published: July 16, 2023 03:43 PM2023-07-16T15:43:13+5:302023-07-16T15:44:50+5:30

Ahmednagar Crime News: नवनागापूर (ता. नगर) येथील चेतना कॉलनीतून ३ वर्षीय बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ३ तासात बेड्या ठोकल्या. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बाळाचे अपहरण झाले होते.  

Ahmednagar: Three-and-a-half-year-old baby kidnapped; The accused was shackled in 3 hours | Ahmednagar: साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण; ३ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

Ahmednagar: साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण; ३ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

- साहेबराव नरसाळे

अहमदनगर : नवनागापूर (ता. नगर) येथील चेतना कॉलनीतून ३ वर्षीय बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ३ तासात बेड्या ठोकल्या. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बाळाचे अपहरण झाले होते.  

चेतना कॉलनी येथील रहीवासी असलेल्या फिर्यादी या दुपारी १२/३० वा चे सुमारास भाडोत्री खोली बघण्याकरीता गेले असता त्यांचे सोबत साडेतीन वर्षांचा मुलगा प्रतीक हा होता. फिर्यादी चेतना कॉलनी येथे भाडोत्री रुम पाहत असताना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर उभा होता. फिर्यादी रुम पाहुन खाली आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर दिसला नाही. त्यांनी आजु बाजुला पाहीले पण त्यांना मुलगा प्रतीक कोठेच मिळुन आला नाही. त्यांनी आजु बाजुला विचारले की येथे लहान मुलगा पाहीला का तेंव्हा तेथील लोकांनी त्यांना सांगीतले की आत्ताच थोडया वेळापूर्वी एक ३०-३२ वर्षाच्या एका इसम त्याला त्याचे बरोबर घेवुन गेला. तेंव्हा फिर्यादी यांची खात्री झाली की माझ्या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. त्यांनी लगेच ११२ क्रमांकावर फोन करुन मुलगा प्रतिक यास एक अनोळखी इसमाने पळवून नेल्याचे माहिती दिली.

 त्यावरून हा फोन कंट्रोल वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त होताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी तात्काळ घटनास्थळी जावून भेट दिली त्यांनी, तात्काळ एक पथक तयार करुन मुलाचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या. मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात एक इसम एका लहान मुलासह संशयीतरीत्या फिरत असल्याची माहिती या पथकाला मिळाली.  पोलिसांनी मेहकरी बस स्टॅन्ड परीसरात शोध घेतला असता जेथे एक इसम हा त्याचे सोबत असलेला मुलगा दिसला. फिर्यादी यांना तो दाखवला असता फिर्यादीने हा त्यांचाच मुलगा असल्याचे ओळखले.  पोलिसांनी संशयीत इसमास ताब्यात घेतले.  देवेंद्र बबन थोरात (रा. शेवगाव) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, तसेच सांगळे, मिसाळ, सानप, देशमुख, शिंदे, पठाडे, अहमदनगर दक्षिण विभागाचे मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंड, नितीन शिंदे यांचे पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Ahmednagar: Three-and-a-half-year-old baby kidnapped; The accused was shackled in 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.