११ जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींचा अहमदनगरला हरिनाम सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:49 PM2018-04-07T15:49:02+5:302018-04-07T16:34:14+5:30

चिचोंडीपाटीलनंतर आता अहमदनगर येथे संत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त दि. ३ ते १० मे २०१८ दरम्यान किशोरवयीन मुलींचा फिरता अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात फक्त मुलींचाच सहभाग राहणार असून ११ जिल्ह्यातील ४० मुली यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजिका चिचोंडीपाटील येथील लक्ष्मीताई खडके महाराज (वृंदावन) यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Ahmednagar Weekly Hanuman Week of Teenage girls in 11 districts | ११ जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींचा अहमदनगरला हरिनाम सप्ताह

११ जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींचा अहमदनगरला हरिनाम सप्ताह

ठळक मुद्देसंत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त आयोजन ४० मुलींचा सहभागकीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मुलीच राहणार
िल लगड अहमदनगर : चिचोंडीपाटीलनंतर आता अहमदनगर येथे संत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त दि. ३ ते १० मे २०१८ दरम्यान किशोरवयीन मुलींचा फिरता अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात फक्त मुलींचाच सहभाग राहणार असून ११ जिल्ह्यातील ४० मुली यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजिका चिचोंडीपाटील येथील लक्ष्मीताई खडके महाराज (वृंदावन) यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. परमार्थाचा आनंद समाजाला मिळावा, तसेच प्रत्येक कुटुंबातील लहान मुलींना प्रेरणा मिळावी असा हेतू या कार्यक्रमाचा आहे. संत मुक्ताई चरित्रकथा संगीतमय पध्दतीने सांगणार असून या सप्ताहात जलसंवंर्धन, वृक्षारोपण, स्त्री भ्रूणहत्या, आईवडिलांची सेवा, शेतकरी आत्महत्या रोखणे याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी हा सप्ताह जाधवनगर, नगर-कल्याण रोड, जाधव पेट्रोलपंपाशेजारी, नालेगाव, अहमदनगर येथे आयोजित केला आहे. या सप्ताहात तीन दिवस पहाटे काकडा, सकाळी विष्णू सहस्त्रनाम, संगीतमय मुक्ताई चरित्रकथा, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.यात सप्ताहात क्रांतीताई महाराज सोनवणे (रामतीर्थ सालेवडगाव, ता. आष्टी), साक्षीताई महाराज वाघ (कोपरगाव), भाग्यश्री महाराज अंबारे (बीड), कीर्ती महाराज गुंड (आठवड), तेजश्री महाराज दिंडे (आळंदी देवाची), माधुरी महाराज शेरेकर (सिन्नर, जि. नाशिक), वैष्णवी महाराज फिसके (चिचोंडीपाटील), पूजा महाराज कुटे (नेवासा), सपना महाराज साखरे (करमाळा, जि. सोलापूर), मुक्ता महाराज सोनवणे (नाशिक), मोनाली महाराज गोर्डे (संगमनेर), ज्ञानेश्वरी महाराज येवले (जामखेड), लक्ष्मीताई महाराज खडके (भागवताचार्य, वृंदावन, चिचोंडीपाटील) यांचे कीर्तन, प्रचवन होणार आहे. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनिअम, हरिपाठ यासाठी ११ जिल्ह्यातील ४० मुलींचा सहभाग आहे. १० मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत भागवताचार्य आदितीदेवीजी महाराज निकम (आळंदी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. काकडा भजन उज्ज्वला ठोंबरे, जनाबाई वाडेकर, सुमन कोकाटे, हजारेबाई, अनुसया ठोंबरे, मनिषा काकाटे, संगीता पवार महाराज करणार आहेत.सप्ताहकाळात विश्वनाथ राऊत, बबन बहिरवाल, संभाजी दरोडे, स्वप्नील पवार, संजय घोडके, बबन थोरात, गणेश महाराज, आसाराम साबळे, रखमाजी गाडे, आकाश भोंडवे, माऊली मोरे, राऊतदादा, शालिनी देशमुख, राधाताई सानप, हिराबाई मोकाटे, सोनाली कर्पे, शारदा सूर्यवंशी, सुनीता ढाकणे ही संत मंडळी भेट देणार आहे.

Web Title: Ahmednagar Weekly Hanuman Week of Teenage girls in 11 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.