अहमदनगर जिल्हा परिषदेचे सीईओ अपघातात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 05:08 PM2021-01-19T17:08:57+5:302021-01-19T17:09:33+5:30
कार व जेसीबी यांच्या समोरासमोर झालेल्या धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर हे जखमी झाले. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत किरकोळ जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील नांदुरफाटा येथे मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास झाला.
संगमनेर/ बोटा : कार व जेसीबी यांच्या समोरासमोर झालेल्या धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर हे जखमी झाले. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत किरकोळ जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील नांदुरफाटा येथे मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास झाला.
नगरहून संगमनेर येथे नगर-कल्याण महामार्गाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर व उपजिल्हाधिकारी संदीप निचीत इन्होवा कारने (क्रमांक एम. एच. १२, जे. एम. ६५५१) जात होते. त्यांची कार आणे ( जि. पुणे) शिवारात नांदुरफाटा येथे आली असता नांदुरला जोडणा-या रस्त्याने जेसीबी अचानकपणे महामार्गावर आल्याने कारची धडक जेसीबीला बसली.
या अपघातात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांचे डोक्याला मार लागला. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना मिळताच त्यांनी तेथील प्रशांत दाते व रामदास देशमुख यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जात दोघांनाही आळेफाटा येथील माऊली अॅक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे आळेफाटा पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले.