जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी

By चंद्रकांत शेळके | Published: January 19, 2024 06:30 PM2024-01-19T18:30:59+5:302024-01-19T18:31:24+5:30

तोडफोड प्रकरण

Ahmednagar Zilla Parishad employees stop work movement; Demand for permanent security arrangements | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर निषेध नोंदवत तासभर काम बंद आंदोलन केले.

जलजीवनच्या कामांची चौकशी होत नसल्याच्या कारणातून गुरूवारी प्रकाश पोटे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे सर्व विभागांत घबराट पसरली. दरम्यान, पोलिसांनी पोटे यांना अटक केली असली तरी या घटनेचा निषेध नोंदवत अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. सकाळी १० वाजता सर्व अधिकारी, कर्मचारी मुख्यालयासमोर जमले. त्यांनी घटनेचा निषेध नोंदवत भविष्यात अशा घटना होणार नाही अथवा समाजकंटकांना वचक बसावा म्हणून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेत पूर्ण वेळ २ बंदूकधारी पोलीस आणि सिंगल डोअर एन्ट्री असावी अशीही मागणी करण्यात आली. हे कामबंद आंदोलन जिल्हा परिषदेसह सर्वच पंचायत समित्यांमध्येही झाले.

आंदोलनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, जलजीवनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिवाजी राऊत, किरण साळवे, सुभाष कराळे, विकास साळुंके, अभय गट, महेंद्र आंधळे, यशवंत सालके, सागर आगरकर, चंद्रकांत वाकचौरे, के. के. जाधव, प्रमोद साळवे, खलील शेख, प्रमोद राऊत, कल्पना शिंदे, प्रशांत मोरे, आदिनाथ मोरे, अनघा कुलकर्णी, बाळासाहेब सोनावळे, सोमनाथ मिटे, संतोष लंके, शशिकांत रासकर, मनोज चोभे, विलास वाघ, संदिप वाघमारे, अंबादास जमदाडे, योगिराज वारुळे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Ahmednagar Zilla Parishad employees stop work movement; Demand for permanent security arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.