अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, भाजपची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 03:10 PM2019-12-31T15:10:32+5:302019-12-31T15:10:48+5:30

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.या निवडणुकीतून भाजपने सपशेल माघार घेतली आहे.

Ahmednagar Zilla Parishad President NCP's Rajashree Ghule, BJP's withdrawalअहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, भाजपची माघार | अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, भाजपची माघार

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, भाजपची माघार


लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.या निवडणुकीतून भाजपने सपशेल माघार घेतली आहे.
भाजपकडून सुनीता खेडकर व उपाध्यक्षपदासा संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राधाकृष्ण विखे यांनी घेतला. त्यामुळे घुले व शेळके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी झाली. भाजपचे गणित जुळत नसल्याने त्यांनी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूक सभेत भाजपच्या सदस्यांची अनुपस्थिती होती, तर शालिनी विखे यांनी मी काँग्रेसमध्येच असल्याचे सांगितले. राधाकृष्ण विखे यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. सभेला ६७ सदस्य उपस्थित आहेत.
---
विखेंची माघार
शालिनी विखे या सलग पाच वर्षे अध्यक्ष आहेत. या निवडणुकीत त्यांनी अर्ज दाखल केला नव्हता, तसेच त्या काँग्रेसमध्येच असल्याचे त्या सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने घुले व शेळके यांना उमेदवारी दिली होती. भाजपने दोघांचे अर्ज दाखल केले होते, मात्र दोघांनीही अर्ज माघारी घेतले. त्यामुळे या निवडणुकीतून विखे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: Ahmednagar Zilla Parishad President NCP's Rajashree Ghule, BJP's withdrawalअहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, भाजपची माघार

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.