नगर शहरातील कापड बाजारातील ‘हा’ भाग उद्यापासून उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 08:30 PM2020-05-26T20:30:01+5:302020-05-26T20:30:08+5:30
अहमदनगर: लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली नगर शहरातील कापडबाजार, घासगल्ली आणि नवीपेठ उद्या सकाळी ९ वाजेपासून सुरू करण्यास महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी परनगी दिली आहे़ तसा आदेश मंगळवारी रात्री उशिराने काढण्यात आला़
अहमदनगर: लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली नगर शहरातील कापडबाजार, घासगल्ली आणि नवीपेठ उद्या सकाळी ९ वाजेपासून सुरू करण्यास महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी परनगी दिली आहे़ तसा आदेश मंगळवारी रात्री उशिराने काढण्यात आला़
पहिल्या दिवशी बुधवारी कापडबाजार, घासगल्ली आणि नवीपेठ भागातील सर्व दुकाने सुरू करण्यास महापालिकेने हिरवा कंदी दाखविला आहे़ दुसºया दिवशी गुरुवारी चितळे रोड, लक्ष्मीकारंजा आणि बँक रोडवरील दुकाने सुरू करता येणार आहेत़ त्यानंतर तिसºया दिवशी शुक्रवारी सारडगा गल्ली, मोची गल्ली आणि गंजबाजार सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे़ शहरातील बाजारपेठा तीन टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत़ मात्र दुकानांमध्ये गर्दी होणार नाही़ ग्राहक व व्यापारी मास्क वापरतील, याची खबरदारी घ्यावी़ दुकानांमध्ये प्रमाणपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे आढळून आल्यास दुकाने तात्काळ बंद करून सील करण्यात येतील, असे आयुक्त मायकलवार यांनी स्पष्ट केले आहे़
आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त मायकलवार यांच्याशी दुपारी चर्चा केली होती़ कापडबाजारातील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी यावेळी व्यापाºयांनी केली़ दुकाने बंद असल्याने मोठे अर्थिक नुकसान होत असून, या दुकानांवर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे़ नियम ठरवून पालिकेने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी़ व्यापारी नियम पाळून दुकाने सुरू करतील़ तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाºया सूचनांचे पालन करतील, असे यावेळी जगताप यांनी सांगितले़ व्यापाºयांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयुक्त मायकलवार यांनी प्रभारी शहर अभियंते सुरेश इथापे यांच्यासह प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला़ त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, तीन टप्प्यांत दुकाने सुरू केली जाणार आहेत़ परंतु, दुकानांमध्ये गर्दी झाल्यास दुकाने तातडीने बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़
़़़़
असे आहेत टप्पे
बुधवार- एम़जी रोड, घासगल्ली, नवीपेठ
गुरुवार चितळेरोड, लक्ष्मीकारंजा, बँक रोड
शुक्रवार- सारडा गल्ली, मोची गल्ली, गंजबाजार