शिवसेनेला खासदारकीचे डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:58 PM2017-10-23T22:58:21+5:302017-10-23T22:58:37+5:30

अहमदनगर शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत.

ahmednagar,shivsena,aamdar,anil,rathod, | शिवसेनेला खासदारकीचे डोहाळे

शिवसेनेला खासदारकीचे डोहाळे

मदनगर : शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत. आमदार होण्याचे अनेकांना स्वप्न आहे, मात्र अनिल राठोड हे आमदारकी सोडायला तयार नसल्याचे वक्तव्य करून शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी राठोड यांच्यावरच निशाणा साधला आहे, तर कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रह धरला आहे.दिवाळीनिमित्त सध्या राजकीय नेत्यांकडून दिवाळीचे फराळ सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. यानिमित्ताने राजकीय नेतेमंडळीही एकत्र येत आहेत. वाढदिवस असो, की दिवाळी फराळ अशा कार्यक्रमांमधून आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा सध्या शहर जिल्हा भाजपकडून केला जात आहे. याशिवाय आमदारकीवरही भाजपचाच डोळा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २२) माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा वाढदिवस व दिवाळी फराळाच्या निमित्ताने बुरुडगाव रोडवर शिवसेनेचा अनौपचारीक मेळावा झाला. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते, महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने फुटलेल्या राजकीय फटाक्यांमधून शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट झाली.या मेळाव्यात शिवसेनेने थेट दक्षिणेच्या खासदारकीवरच दावा केला आहे. घनश्याम शेलार यांनी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीच खासदारकीची निवडणूक लढवावी, असे सांगत पहिला फटाका फोडला. तोच सूर धरत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी अनिल राठोड हे काही आमदारकी सोडायला तयार नसल्याचे सांगून सर्वांच्याच मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे इच्छुकांना खासदारकी किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगत थेट राठोड यांच्यावरच निशाणा साधला. अनिल राठोड यांनी मात्र युती नसल्यानेच आपला पराभव झाल्याची कबुली दिली. भाजपच्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करून आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युती गरजेची असल्याचे संकेत दिले.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेनेला अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत झालेले शिवसेनेचे महापौर हे भाजपच्याच सहकार्यामुळे झाल्याचे अधोरेखित करून शिवसेना-भाजप युती शहरासाठी आवश्यक असल्याचे सांगत राठोड यांच्या सुरात सूर मिसळला.

Web Title: ahmednagar,shivsena,aamdar,anil,rathod,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.