हवेतील घटकांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:42+5:302021-02-07T04:19:42+5:30
अहमदनगर : राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने शहरातील हवेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. या यंत्राची उपायुक्त यशवंत ...
अहमदनगर : राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने शहरातील हवेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. या यंत्राची उपायुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी पाहणी केली.
यावेळी सहायक आयुक्त सचिन राऊत, सहायक आयुक्त संतोष लांडगे, उद्यान अधिकारी उद्धव म्हसे, किशोर कानडे, ठेकेदार कंपनीचे दिलीप जाधव, धनंजय जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त डांगे म्हणाले, दिवसेंदिवस ऋतुमानात होणाऱ्या बदललामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. शहरातील हवेची गुणवत्ता तपासणीचे काम सुरू केले असून त्याचा अहवाल दहा दिवसात प्राप्त होणार आहे. त्यात त्रुटी आढळ्यास त्यावर उपाययोजना करण्यात येतील.
अभियानातून शहराच्या स्वच्छतेत, सुंदरता व पर्यावरणात बदल घडवायचे आहे. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, हा उद्देश आहे. हवामानातील घटकांचा अभ्यास करून त्यामधील त्रुटी दूर करून उपाययोजना केल्या जातील, असे सहायक आयुक्त लांडगे यांनी सांगितले.
---