नातवाने केला आजीचा खून; धक्कादायक कारण समोर येताच परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:26 AM2024-12-04T10:26:31+5:302024-12-04T10:28:22+5:30

नातवाने आजीच्या डोक्यात दगडाने मारून व कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर वार करून ठार मारले आहे. 

akkalkot Grandson killed grandmothe shocking reason revealed | नातवाने केला आजीचा खून; धक्कादायक कारण समोर येताच परिसरात खळबळ

नातवाने केला आजीचा खून; धक्कादायक कारण समोर येताच परिसरात खळबळ

अक्कलकोट: वडिलांना कोणत्या दवाखान्यात उपचार करायचे, या कारणावरून आजी व नातू यांच्यात झालेल्या वादावरून नातवाने कुऱ्हाड, दगडाने मारून आजीचा खून केला आहे. ही घटना कुरनुर (ता. अक्कलकोट) येथे दि. २ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात निर्मला संतराव सुरवसे (वय ७०, रा. कुरनूर, ता. अक्कलकोट) मरण पावल्या आहेत.

या प्रकरणी सुमित सदाशिव सुरवसे (रा.कुरनूर ता.अक्कलकोट) हकिकत अशी की, यातील निर्मला सुरवसे आणि आरोपी हे नात्याने आजी-नातू असून, दि.२ डिसेंबर रोजी रात्री ९ वा.चे सुमारास निर्मला संतराव सुरवसे हिस आरोपी याने वडिलांवर कोणत्या दवाखान्यात उपचार करायचा, यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आजीच्या डोक्यात दगडाने मारून व कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर वार करून ठार मारले आहे. 

याबाबत संतराम विठोबा सुरवसे, सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सुमित सुरवसे यास पोलिसांनी तत्काळ अटक करून येथील कोर्टासमोर उभे केले असता, त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पीएसआय पांडुरंग पवार हे करीत आहेत. घटनास्थळी डीवायएसपी विलास यामावर, पोलिस निरीक्षक महेश स्वामी, सपोनि, नीलेश बागाव यांनी भेट देऊन पाहणी केली.  
 

Web Title: akkalkot Grandson killed grandmothe shocking reason revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.