अकोले मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे विजयी, भाजपचे वैभव पिचड पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 02:28 PM2019-10-24T14:28:01+5:302019-10-24T14:29:33+5:30
अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविला. भाजपचे वैभव पिचड यांचा त्यांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे आघाडीवर होते. डॉ. किरण लहामटे ९९ हजार ४४० तर वैभव पिचड यांना ४८ हजार ६०६ मते मिळाली आहेत. केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.
अकोले : अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविला. भाजपचे वैभव पिचड यांचा त्यांनी पराभव केला.
पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे आघाडीवर होते. डॉ. किरण लहामटे ९९ हजार ४४० तर वैभव पिचड यांना ४८ हजार ६०६ मते मिळाली आहेत. केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.
निवडणुकीपुर्वी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ च्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार तत्पुर्वी वडील माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते. यावेळी अकोले तालुक्यातील विभाजन रोखण्यास शरद पवारांना यश आले. भांगरे परिवारही लहामटे यांच्या पाठीशी उभा राहिला.