अकोले नगरपंचायत नाशिक विभागात दुसरी : स्वच्छ महाराष्ट्र अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 07:55 PM2019-03-12T19:55:44+5:302019-03-12T19:55:44+5:30
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे.
अकोले : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. यात देशातील १०० शहरात अकोले शहराने ९४ वा तर नाशिक विभागात दुसरा क्रमांक पटकविला आहे. तर नगरपंचायतीने कचरा मुक्त शहर मानांकन ही मिळविले आहे.
अकोले नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. घनकचरा संकलन व विलगीकरण (ओला व सुका कचरा), ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, प्लॅस्टिक बंदी, हागणदारीमुक्त शहर (ओडिएफ), शौचालय दुरुस्ती व सुशोभिकरण, अपंगासाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे, हागणदारीची ठिकाणे सुशोभिकरण, डस्टबीन, लीटरबीन, दैनंदिन रहिवासी भागात साफसफाई, व्यापारी भागात दोन वेळेस साफसफाई व घंटागाडीद्वारे कचरा संकलन या मुद्यांवर काम केले आहे.
हागणदारीमुक्त दर्जा, कचरामुक्त तारांकित मानांकन दर्जा (स्टार रेटींग), प्लास्टिक बंदी, कचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया या मुद्यांचा स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत समावेश होता.