अकोलेच्या निळ्या भाताची मुख्यमंत्र्यांना भुरळ, व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे साधणार संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 03:05 PM2020-09-08T15:05:46+5:302020-09-08T15:06:39+5:30
कोतुळ (जि. अहमदनगर): ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात ‘अकोलेत इन्डोनेशीयाच्या निळ््या भाताचा राज्यातील पहिला प्रयोग’ हे वृत प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे गुरूवारी दहा सप्टेंबर रोजी थेट अकोले तालुक्यातील मेहंदुरीतील थेट शेतात व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहेत.
मच्छिंद्र देशमुख
कोतुळ (जि. अहमदनगर): ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात ‘अकोलेत इन्डोनेशीयाच्या निळ््या भाताचा राज्यातील पहिला प्रयोग’ हे वृत प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे गुरूवारी दहा सप्टेंबर रोजी थेट अकोले तालुक्यातील मेहंदुरीतील थेट शेतात व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहेत, असे जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी यांनी सांगीतले आहे.
‘लोकमत’ने अकोल्यातील इन्डोनेशियाच्या निळ्या भाताचा आसाम ते अकोले प्रवास तसेच त्याचे निळा व ब्लॅक राइस असे झालेले नामकरण, मेहंदुरीतील शेतकरी विकास आरोटे यांनी तीन किलो बियाण्यापासून दहा एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या सहकार्यातून वाढवलेले क्षेत्र याबाबत दिल्लीसह राज्यातील सर्व आवृत्तीत हे वृत्त प्रसिद्ध केले.
या वृत्ताची राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी चर्चा झाली. या भाताच्या वाणाचा मोह मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनाही आवरला नाही. गुरुवार ‘विकेल तेच पिकेल’ या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री व कृषी मंत्री गुरवारी (१० सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते साडे अकरा दरम्यान आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे होणार आहे. त्यात मुख्यमंत्री थेट अकोल्यातील मेहंदुरीतील त्या भातशेतात लाइव्ह येणार आहेत. या तयारीसाठी आजपासूनच अकोले तालुका कृषी विभागाची लगबग सुरू झाली आहे.
------
यांचा असेल सहभाग
मुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भूसे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार, विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे हे सहभागी होणार आहेत. तर अकोलेतून (मेहंदुरीतून ) शेतकरी, विकास देवराम आरोटे, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे , लोकमत प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.