अकोलेत आदिवासी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:39 AM2018-05-14T03:39:36+5:302018-05-14T03:39:38+5:30

फडकी फाउंडेशनच्या वतीने १६ मे २०१८ रोजी अकोले येथे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Akolit Tribal Literature Convention | अकोलेत आदिवासी साहित्य संमेलन

अकोलेत आदिवासी साहित्य संमेलन

अकोले (जि. अहमदनगर) : फडकी फाउंडेशनच्या वतीने १६ मे २०१८ रोजी अकोले येथे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सामाजिक व कला-साहित्यिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या आदिवासी बांधवांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती फडकीचे अध्यक्ष डॉ. संजय लोहकरे यांनी दिली.
अकोले शहरातील महालक्ष्मी मंगल कार्यालयात होणाºया या एक दिवशीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन गडचिरोली येथील कवयित्री कुसूम आलाम, ज्येष्ठ साहित्यिक महादेव टोप्पो (रांची), सांगल्याभाई वळवी (गुजरात) यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘आदिवासी साहित्य व समाजापुढील आव्हाने’ या चर्चासत्रात कॉम्रेड वाहरू सोनवणे (नंदूरबार), डॉ. विक्रम चौधरी (गुजरात), डॉ. संजय दाभाडे (पुणे), डॉ. विनोद कुमरे (मुंबई), डॉ. जयश्री गावित (धुळे) हे सहभागी होणार आहेत. आमदार कॉम्रेड जे. पी. गावित, कॉम्रेड डॉ. अजित नवले व राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते साक्रीचे सामाजिक कार्यकर्ते डोंगरभाऊ बागुल यांना जीवन गौरव, नंदूरबारचे संतोष पावरा, अकोलेचे सुनील घनकुटे यांना साहित्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Akolit Tribal Literature Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.