जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:29 PM2018-03-13T16:29:46+5:302018-03-13T16:33:34+5:30
राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे.
ठळक मुद्देराजुरी येथील घटनाअल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा
ल कमत न्यूज नेटवर्कजामखेड(जि. अहमदनगर) : तालुक्यातील राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, पीडित मुलीचे आई वडील ऊसतोड कामगार असल्याने ते अनेक वर्षांपासून ऊस तोडणीचे काम करुन आपली उपजीविका भागवतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पीडित मुलीचे आई-वडील अत्याचार झालेल्या मुलीस आपल्या राजुरी गावात आजी-आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवून जातात. यंदाचा दीपावली सण संपल्यानंतर ते सातारा जिल्ह्यातील कापसी येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले होते. पीडित मुलगी ही गावातील इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकत आहे. याच गावातील १७ वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या घरी येत असे. याचवेळी घरी कोणी नसताना त्याने मुलीचे आई-वडील साखर कारखान्यावर गेल्यापासून म्हणजे आॅक्टोबर २०१७ पासून ते ९ मार्च २०१८ पर्यंत मुलीस जबरदस्तीने धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केला. मुलीने सदरील घटना ही आपल्या आजी-आजोबांना सांगितली. यानंतर या अल्पवयीन मुलीस खासगी दवाखान्यात दाखल केले असता ती गरोदर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले, असे पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करीत आहेत.