जामखेडमध्ये छुप्या मार्गाने दारु, मटका खुलेआम

By Admin | Published: April 18, 2017 05:55 PM2017-04-18T17:55:16+5:302017-04-18T17:55:16+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत दारूविक्रीला बंदी असली, तरी छुप्या पध्दतीने चढ्या दराने दारू सर्रास विकली जात आहे.

Alcohol, maatka openly hidden in Jamkhed | जामखेडमध्ये छुप्या मार्गाने दारु, मटका खुलेआम

जामखेडमध्ये छुप्या मार्गाने दारु, मटका खुलेआम

मखेड : जामखेड शहरासह तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने मटका खुलेआम चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत दारूविक्रीला बंदी असली, तरी छुप्या पध्दतीने चढ्या दराने दारू सर्रास विकली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व जिल्हा महामार्गावरील बिअरबारमधील देशी, विदेशी दारूविक्री, देशी दारू दुकाने एक एप्रिलपासून बंद झाली. मात्र छुप्या अवैध पद्धतीने दारूविक्रीचा काळा धंदा जोरात सुरू आहे. नगर -जामखेड व बीड या राष्ट्रीय महामार्गालगतची देशी-विदेशी दारू दुकाने बंद झाल्याने छुप्या मार्गाने अव्वाच्या सव्वा भावाने दारूविक्री सुरू आहे. दारूबंदीचा फटका तळीरामांना बसला नसल्याचे दिसून येते. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई होण्याऐवजी ग्रामीण भागात पानटपºया, किराणा दुकान व खानावळ येथे छापे टाकून किरकोळ गुन्हे दाखल होत आहेत. जामखेड शहरातून जाणाºया नगर -जामखेड -बीड- खर्डा या राज्य मार्गावर असंख्य हॉटेल व ढाबे आहेत. बहुतांश ढाब्यांच्या मागील बाजूस अथवा पानटपºयांमध्ये अवैध दारूचा साठा केला जातो. मटका अड्ड्याचे केंद्रजामखेड, खर्डा, नान्नज, जवळा, अरणगाव हे प्रमुख मटका अड्ड्याचे केंद्र आहे. जवळपास १९ मटका पेढीमालकांनी पंटरमार्फत तालुक्यात मटक्याचे जाळे विणले आहे. जुने, नवे बसस्थानक, बाजारतळ, बीड व खर्डा रस्ता येथे खुलेआम मटक्याच्या टपºया आहेत. या टपºयांमधून दिवसा कल्याण व रात्री मुंबई मटक्याचे आकडे दहा टक्के कमिशनवर पंटर मटकापेढी चालकाकडून घेतले जातात.

Web Title: Alcohol, maatka openly hidden in Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.