रिक्षातून दारूची वाहतूक : १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:25 AM2018-09-12T11:25:08+5:302018-09-12T11:25:30+5:30
देशी-विदेशी मद्याची रिक्षातून वाहतूक सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून १ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़
अहमदनगर : देशी-विदेशी मद्याची रिक्षातून वाहतूक सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून १ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी रिक्षाचालक नूरमोहम्मद सुलेमान शेख (वय ५७) याला अटक करण्यात आली.
कल्याण रोडवरील नालेगाव परिसरात रिक्षातून मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क पथकाला मिळाली होती़ पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा लावून (एम़एच १२, ए़ आऱ ९३४२) या क्रमांकाची रिक्षा ताब्यात घेऊन तपासणी केली तेव्हा आतमध्ये देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या़ यावेळी ताब्यात घेण्यात आलेला रिक्षाचालक शेख याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली़ उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अण्णासाहेब बनकर, संजय सराफ, दुय्यम निरीक्षक एस़एस़ भोसले, बी़बी़ हुलगे, सचिन वामने, जवान भरत तांबट, पांडुरंग गदादे, नंदकिशोर ठोकळ, अविनाश कांबळे, पी़एस़ भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.