सर्व औषधे 'टॅक्स फ्री' करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:42+5:302021-04-26T04:18:42+5:30

कोरोनाच्या रूपाने महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली आहे. महामारीचे प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २०२० वर्षापासून लॉकडाऊन ...

All medicines should be made tax free | सर्व औषधे 'टॅक्स फ्री' करावीत

सर्व औषधे 'टॅक्स फ्री' करावीत

कोरोनाच्या रूपाने महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली आहे. महामारीचे प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २०२० वर्षापासून लॉकडाऊन काळामुळे बहुतांश सर्वच सामान्य नागरिकांना जीवन जगणे असह्य झाले असून, जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कुटुंबासह सर्वांना जगण्यासाठी प्रचंड आर्थिक अडचण निर्माण होत आहे. जगण्याचा गंभीर प्रश्न सामान्य माणसावर उद्भवला आहे. कोविडमुळे वैद्यकीय उपचारावर रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्चाचा बोजा प्रत्येक व्यक्तिला सहन करावा लागत आहे. अशा नाजूक परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने राज्यात सर्व औषधे ही ‘टॅक्स फ्री’ करावीत व सर्वसामान्य माणसाला या संकटाच्या काळात दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मनोरंजनासाठी चित्रपट टॅक्स फ्री केले जातात, याच धर्तीवर माणसं जिवंत ठेवण्यासाठी सध्याच्या महामारीत व आणीबाणीसदृश परिस्थितीमध्ये सर्व औषधे 'टॅक्स फ्री' करणे गरजेचे आहे.

औषधे टॅक्स फ्री मिळाली पाहिजेत, अशी मागणी राज गवांदे, ओम काळे, वर्षा चौधरी, अशोक आवारी, सुशांत वाकचौरे, विक्रांत शेळके, अक्षय अभाळे आदींनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, आरोग्य, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांना ई मेल पाठविण्यात आले आहे.

Web Title: All medicines should be made tax free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.