सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात प्रवेशबंदी!
By शेखर पानसरे | Published: October 26, 2023 02:51 PM2023-10-26T14:51:02+5:302023-10-26T14:56:59+5:30
सकल मराठा समाज; मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
संगमनेर : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भाने ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.२६) संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत वेल्हाळे गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, तहसीलदार धीरज मांजरे आदींना निवेदन पाठविण्यात आल्याचे वेल्हाळे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. निवेदनावर अनेकांची नावे आणि सह्या आहेत.